पन्हाळा / प्रतिनिधी
पन्हाळ्यावर पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. बिबट्याने डॉ.राज होळकर यांच्या घरात घुसून होळकर यांच्या कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. कुत्र्याच्या ओरडण्याने हा प्रकार लक्षात येताच होळकर यांनी आरडाओरड करून बिबट्याला पिटाळले. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
यापूर्वीही बिबट्याने होळकर यांनी पाळलेल्या चोवीस कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. आज पुन्हा एकदा हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही घटना मध्यरात्री घडली आहे.