प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्ते नुकतेच जाहीर केले मुख्य प्रवक्तेपदी खासदार संजय राऊत यांच्याबरोबर हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनाही प्रवक्ते पदी संधी दिली आहे. यासह अन्य दहा पक्ष प्रवक्त्यांची नावे निश्चित केली. कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच खासदार माने यांच्या रूपाने संधी मिळाली आहे.
अन्य नावे अशी
खासदार अरविंद सावंत, खासदार प्रियंका चतुर्वेदी, विधान परिषद उपसभापती आमदार निलम गोऱ्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रतापराव सरनाईक, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे.