पुष्पनगर ग्रामपंचायतीचा ऊस उत्पादकांना फतवा
वाहन चालकाला खेपेला शंभर आणि जेवणाचा डबा
तोडणी मजुरांना टनाला 50 रुपये
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
महापूर आणि अतिवृर्ष्टीने मेटकुटीला आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागील साडेसाती अजूनही पाठ सोडायला तयार नाही. वातावरणातील बदलामुळे उसाचे वजन घटले असताना आता ऊस तोडणीसाठी कायदेशीर खुशाली मोजावी लागणार आहे. मजुरांना टनाला पन्नास रुपये तर वाहन चालकाला खेपेला शंभर आणि जेवणाचा डबा द्यावा, अशी नोटीस वजा फतवा भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर ग्रामपंचायतीने बजावला आहे. नियम मोडल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागले, असा दमही या नोटीसमध्ये दिल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, शरद जोशी विचार मंचने याची गंभीर दखल घेतली असून साखर आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे बेकायदेशीर नोटीस बजावणाऱ्या पुष्पनगर ग्रामपंचायत तातडीने बरखास्त करावी अशी मागणी केली आहे.
लुटीला कायदेशीर हक्क देण्याचा प्रयत्न
कोल्हापूर विभागात परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड कर्नाटकातून काही प्रमाणात मजूर दाखल झाले आहेत. ऊस क्षेत्राच्या प्रमाणात मजुर नसलेने तोडी संथगतीने सुरु आहेत. शक्य आहे, तेथे ठिकाणी मशीनचा वापर होत आहे. मात्र अडचणीच्या ठिकाणी मजुरांशिवय पर्याय नाही. याचाच गैरफायदा ऊस तोडणी मजूर घेत आहेत. याला कारखान्याचे काही कर्मचारीही बळ देत आहेत. स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱयांना हातशी धरुन लिखीत फतवा काढून शेतकऱयांच्या लुटीला कायदेशीर हक्क देण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुष्पनगर ता. भुदरगड ग्रामपंचायतीने 14 नोव्हेंबरला लेखी नोटीस काढली आहे. शेतकऱ्यांना दम दिला आहे. ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांनी, ऊस तोडणी व वहातुकी साठी चालकाला 100 रुपये, जेवनाचा डबा व ऊसतोडणी करणारेंना प्रती टन 50 रोख व जेवन देणाचे आदेश नोटीसमध्ये दिले आहेत. नोटसचे उल्लंघन केले तर ऊस ऊत्पादक शेतकऱयांना एक हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेशही नोटीस मध्ये दिलेले आहेत.
जिल्हा परिषद कारवाई करणार काय?
शेतकऱ्यांना उसतोडीसाठी पैसे मोजा असा ठराव करणारी पुष्पनगर ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी. ही गंभीर बाब शरद जोशी विचार मंचने समोर आणली, सीईओंकडे तक्रार केली. मात्र अद्याप काहीच हालचाल झालेली नाही. कायदेशीर बाबी तपासून संबधितांवर कडक कारवाई केली पाहिजे अन्यात ऊस पट्ट्या त अशा बेकायदेशीर ठरावांचा नवा पायंडा पडेल अशी भीती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आहे.
त्यांना बेड्या ठोका
पुष्पनगर ग्रामपंचायत अतिसिघ्र बरखास्त केली पाहिजे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, संबधीत साखर कारखाने अधिकारी यांचेवर भ्रष्ट्राचार, भ्रष्ट्राचाराला सहकार्य करणे, उस ऊत्पादकांची अर्थीक लुट, फसवणुक, करणे, पदाचा व कायद्याचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी करुन बेड्या ठोका.
विठ्ठल पवार राजे,शरद जोशी विचार मंच