प्रतिनिधी / असळज
खोकुर्ले ता.गगनबावडा जि.कोल्हापूर येथील मनोहर रामा पाटील यांचा खोकुर्ले येथील प्रभूची मळी नावाच्या जंगलात मृतदेह आढळून आला. गेले वीस ते पंचवीस दिवसापासून ते बेपत्ता होते. याबाबतची बेपत्ता फिर्याद गगनबावडा पोलिस स्थानकात देणेत आली होती. मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असलेने स्मरणशक्तीचा त्यांना आजार होता. मृत देहाचा पंचनामा गगनबावडा पोलिस करत आहेत.