वार्ताहर / यड्राव
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून युवराज अशोक खोत( वय वर्ष 30 रहाणार हनुमान मंदिर जवळ खोतवाडी तालुका हातकलंगले )या युवकाला पाच ते सहा इसमाने मागाच्या लाकडी माऱ्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक 1 रोजी रात्री दहाच्या सुमारास यड्राव फाटा येथे घडली याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अंकुश आप्पासो शिंदे, सागर महादेव बडवे, ऋषिकेश बाबासो पाटील व इतर चार ते पाच अनोळखी इसमां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 1 रोजी युवराज खोत हे हॉटेल सेव्हन स्टार येथून घरी जात असताना रात्री दहाच्या सुमारास अंकुश शिंदे, सागर बडवे, ऋषिकेश पाटील व त्यांच्या साथीदारांनी यड्राव फाटा येथे त्यांना अडवून पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अंकुश शिंदे यांनी हातातील लाकडी माऱ्याने डोकीत मारले त्यामुळे युवराज खाली कोसळला असता इतर साथीदाराने अचानकपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. या मारहानीत त्याच्या डोक्याला व नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत संशयितांना ताब्यात घेण्याचे काम शहापूर पोलिस करीत होते.