प्रतिनिधी / गगनबावडा
मंगळवारी आणखी दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गगनबावडा तालुक्यात आज या संसर्गजन्य रोगाची शंभरी पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेजारील तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता गगनबावडा तालुक्यात तशी संथगतीने बाधितांची संख्या वाढत आहे. तालुक्यात आज अखेर या रोगावर मात केलेल्या 81 जणांना घरी पाठवले आहे. तर कोरोनाने तिघांचा बळी गेला आहे. 14 रुग्ण सध्या उपचारात आहेत. मंगळवारी आणखी दोघांची भर पडली आहे त्यामुळे तालुक्यात आता कोरोनाबाधितांची शंभरी पार झाली आहे. तालुका प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली. सोशल डिस्टंन्स,विनामास्क वाल्यांना खाकी वर्दीचा प्रसाद, संचारबंदीस उत्स्फूर्त सहभाग त्यामूळे कोरोणावर आजअखेर नियंत्रण ठेवता आले. येत्या काळात या रोगाची तिसरा टप्पा सुरु होणार आहे. ही संथगतीची वाढ अशीच राखण्यासाठी येथील जनतेला आणखी दक्षता घ्यावी लागणार आहे.