प्रतिनिधी / कोल्हापूर
गडहिंग्लज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी जनता दलाचे महेश कोरी यांची निवड झाली आहे. त्यांना २० पैकी १५ मते मिळाली. तर विरोधात असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सावित्री पाटील यांना ५ मते मिळाली.
भाजपचे मत जनता दलाच्या पारड्यात पडले. १५ विरूद्ध ५ मताने नगसेवक कोरी यांची गडहिंग्लज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा नगराध्यक्ष स्वाती कोरी यांनी जाहिर केले. सर्व प्रक्रिया ऑनलाईनने पार पडली. निवडीनंतर जनता दलाचे आणि नगरसेवक महेश कोरी यांच्या समर्थकांनी फटाका वाजवून आंनद व्यक्त केला.