प्रतिनिधी / गडहिंग्लज
शहरातील मुख्य रस्त्यावर नगरपालिकेच्या समोरील कंपाऊडला शुक्रवारी रात्री वेगाने आलेल्या दु धडक दिल्याने गंभीर जखमी होवून तो जागीच मयत झाला. ऋषिकेश उमेश पोतदार (वय २५ रा. बुरूड गल्ली गडहिंग्लज) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलीसात करण्यात आली आहे.
ऋषिकेश हा शुक्रवारी रात्री आपल्याकडील असणारी केटीएम ड्युक ही दुचाकी घेवून घरातून बाहेर पडला होता. रस्त्याकडेच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने मुख्य रस्त्यावर जात होता. नगरपालिका समोरील रस्त्याच्याकडेला लावलेल्या दुचाकीला जोराची धडक मारून तसेच पुढे जात नगरपालिकेच्या कंपाऊडला धडक दिल्यावर तो गंभीर जखमी झाला. त्यातच तो मयत झाला. याची वर्दी संग्रामसिंह पाटील (रा. डॉक्टर कॉलनी गडहिंग्लज) यांनी गडहिंग्लज पोलीसात दिली आहे. याचा अधिक तपास हवालदार एस. व्ही. पाटील करत आहेत.