एटीएम फोडल्यासह चोरीचे गुन्हे उघडकीस
प्रतिनिधी / कोल्हापूर :
उचगाव चौकातील एका बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा सराईत चोरट्यांना गांधीनगर पोलिसांनी अटक केली. सचिन दत्तात्रय गवळी (वय 33 साळोखे पार्क), राहुल राजेश माने (वय 30 कानानागर), चंद्रकांत शशिकांत तळकर ( वय 40 शिवाजी पुतळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील ट्रकच्या बॅटरी चोरी, उचगाव चौकातील एटीम फोडण्याचा प्रयत्न, राजेंद्रनागर येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आणले आहेत.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, दीपक भांडवळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे, अतुल कदम, सुजय दावणे, आकाश पाटील, मोहन गवळी, सुनील कुंभार, चेतन बोगाळे यांनी ही कारवाई केली.
यातील सचिन गवळीच्या नावावर 1 खून, 2 दरोडे, 2 जबरी चोरीचे 3 चोरी, 4 घरफोडी,1 दुखापत, 1 विणायभंग असे 15 गुन्हे दाखल आहेत.