उचगाव / वार्ताहर
बेकायदेशीररित्या विनापरवाना विदेशी दारू विकणार्या गुलशन गोपालदास अहुजा (वय २५, रा. शिरू चौक गांधीनगर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४४ हजार २७९ रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त केले.
जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू असताना अहुजा याने घरात दारूचा साठा करून विकत होता. याबाबत पोलीस नाईक राजेंद्र दिनकर कुंभार यांनी फिर्याद दिली असून अहुजा याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.