उदय रेंदाळे यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीद्वारे केला आरोप
चंदूर / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील उदय चंद्रकांत रेंदाळे यांनी चंदूर ग्रामपंचायत वर शौचालय अनुदान भ्रष्टाचाराचे व गोटा प्रकल्पात बेकायदेशीर मंजुरी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी मागितलेल्या माहिती अधिकारातून 2019 ते 2020 दरम्यान फक्त 6 शौचालय अनुदान मंजूर झाल्याची माहिती त्यांना दिली गेली आहे. यावर गावात जवळपास सातशे शौचालय अनुदान वाटप झाल्याचे व यात मोठा गैरकारभार झाल्याची वृत्त सर्व वृत्तपत्रांमध्ये छापून आले होते असे असताना चंदुर ग्रामपंचायतीने केवळ सहा संडास शौचालय अनुदान मंजूर झाल्याचे दाखवले आहे त्याचबरोबर गोटा प्रकल्प अनुदानात ज्यांच्या गाई-म्हशी नाहीत त्यांनाही अनुदान मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली चंदूर ग्रामपंचायतने जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न केल्याची केल्याचा आरोप उदय रेंदाळे यांनी केला आहे व सर्वसामान्य लाभार्थ्यांना यापासून वंचित ठेवल्याचा आरोपी त्यांनी केला.