चंदूर / वार्ताहर:
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे कालपासून झोले मळी शेजारील पंचगंगा नदीपात्रात मगरीचे वास्तव्य असल्याचे शेजारील शेतकऱ्याना निदर्शनास आले आहे. ही मगर सात ते आठ फूट मोठी असल्याची महिती परिसरात मासेमारी करणारे मच्छिमारांनी सांगितल्याने इंगळीच्या शेतकरी वर्गात व चंदुर परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यानी मगर दिसल्यानंतर माजी सरपंच माणिक पाटील याना त्याची कल्पना दिली.त्यांनी चंदुर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे यांना कल्पना दिली.त्यानंतर गावातील शेतकरी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील राहुल वाघमोडे, माजी सरपंच संजय घोरपडे आदीसह सर्व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्षदर्शी मगर पाहिल्यानंतर ही बाब वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे.