उत्तर कार्य करून मगदूम परिवाराने जपली आपूलकी
जालंदर पाटील / चुये
घरातील एखाद्या व्यक्तीचे अचानक निधन झाल्यानंतर त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो त्यानंतर रितीरिवाजाप्रमाणे सर्व विधी पार पाडले जातात. मात्र, घरातील पाळीव प्राण्याचे अचानक निधन झाले तर फक्त चर्चा होते. विधी नाहीत होत. पण याला चुयेतील मगदूम कुटुंबिय अपवाद ठरलय. चुये ताकरवीर येथील मगदूम कुटुंबाने मोत्या या त्यांच्या घोड्याचे अपघाती निधन झाल्यानंतर त्याला कुटुंबातील एक घटकच मानून कृतज्ञता म्हणून उत्तर कार्य करून पाळीव प्राण्यांवरील प्रेम दर्शन दाखवून दिले आहे.
चुये गावातील उत्तम बाळासो मगदूम यांनी मोत्या नावाचा घोडा पाळला होता. जनावारांना वैरण आणणाऱ्या गाडीसाठी त्याचा वापर केला जात होता. घोडा म्हटलं की दंगेखोर असं म्हटलं जातं. मात्र, हा मोत्या घोडा फार शांत स्वभावाचा होता. त्याच्याकडून कोणताही अवगुण कधीच घडला नाही. त्यामुळे मगदूम परिवाराची त्याच्यावर प्रचंड प्रेम होते. त्यामुळे त्याची जपणूक संगोपनअगदी प्रेमाने आपुलकीने केली जात होती. मोत्या फार गुणी असल्यामुळे तो मगदूमपरिवाराचा कुटुंबातला एक घटक बनला होता.
घोडागाडी शर्यतीमधला तो बाजीगर होता. स्पर्धेत त्याचा सहभाग म्हणलं की त्याच्यावर प्रेम करणाऱ्या कुटुंबाशिवाय बाहेरची मित्रमंडळीही मोत्याला पाठबळ द्यायला आवर्जून त्या स्पर्धेला हजर असायचे. त्यामुळे तो प्रत्येक शर्यतीमधला बाजीगर ठरला होता. कुटुंबाप्रमाणे इतरांचासुद्धा तो लाडका घोडा ठरला होता. रंगाने पांढरा शुभ्र आणि तब्येतीने गुटगुटीत असणारा मोत्या सर्वांना आपलाच वाटायचं. मात्र, मोत्याला नियतीची दृष्ट लागली तू चढताना कुत्र्याने चावा घेतला मात्र, ही घटना मालकाच्या लक्षात आलीच नाही त्यामुळे दुर्लक्षित झाली. काही काळानंतर त्याला रेबिजचा प्रादुर्भाव झाला आणि त्यातच मगदूम परिवाराशिवाय आणि मित्रमंडळींचा दोस्त बनलेल्या मोत्याने जगाचा अचानक निरोप घेतला.
मोत्याच्या जाण्यान मगदूम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील एखादी व्यक्ती जावी असाच प्रसंग त्यांच्यावरती आला. सोशल मीडियावरून त्यावर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळींनी शर्यत प्रेमीनी अक्षरशः श्रद्धांजलीचा वर्षाव केला. श्रद्धांजलीमध्ये मोत्यांनी जिंकलेल्या शर्यतीचे व्हिडिओ व्हायरल केले. यावरूनच मगदूम परिवाराशिवाय मोत्या इतरांच्याही किती जिवाभावाचा होता हे स्पष्ट होते. त्यानंतर मोत्यावरील प्रेम कृतज्ञता म्हणून मगदूम परिवाराने चक्क उत्तर कार्याचा निर्णय घेतला कुटुंबातील व्यक्ती प्रमाणेच त्याचा सुंदर फोटो बनवला. ज्या ठिकाणी फोटो लावला, त्याठिकाणी सजावट केली गेली. मोत्याप्रेमींनी त्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
मगदूम परिवाराकडून आमचा मोत्या गुणी होता अस सांगत मोत्याच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा मिळाला. घरातील पाळीव प्राणी आणि त्याच्यावर असणार प्रेम त्याच्या अचानक जाण्याने घरातील व्यक्तींप्रमाणेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करून त्याचा विधी पार पाडत खरोखरच मगदूम परिवाराने एका पाळीव प्राण्यांवरील अनोखे प्रेमाचे दर्शन निश्चितच या निमित्ताने दाखवून दिले आहे एवढं मात्र नक्की.