प्रतिनिधी / कुरुंदवाड
गेल्या चौदा वर्षे रखडलेल्या शिरोळ तालुक्यातील शिरदवाडच्या पेयजल योजनेचे टेंडर प्रसिद्ध करून ते काम ताबडतोब सुरू करावे अशी मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना एका पत्राद्वारे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी संजय कुलकर्णी यांनी केली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत शिरदवाड येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शासनाचा आदेश क्रमांक ग्रा. पा.पू. 2418/ प्र. क्र.316/ पा. पू. 17 ( मंत्रालय) 20 मार्च 2012 2020 चे परिपत्रकानुसार आपल्याकडे आले आहे. या गावच्या नळपाणी पुरवठा योजनेचे 14 वर्षे झाले असून ते अद्याप अपुरेच आहे.
धर्म या योजनेच्या पूर्ततेसाठी यापूर्वी आपण अनेक आंदोलने निवेदने लेखी पत्र अहवाल या माध्यमातून पाठपुरावा केला आहे मात्र, सुधारित अंदाजपत्रकानुसार अद्याप टेंडर प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. तरी आपण गांभीर्याने लक्ष देऊन तमाम नागरिकांना न्याय द्यावा व शिरदवाडची सुधारित नळ पाणीपुरवठा योजना ताबडतोब सुरू करावी अशी मागणी कुलकर्णी यांनी या निवेदनात केली आहे.
ते म्हणाले की सध्याच्या covid-19 च्या अनुषंगाने कोणतेही आंदोलन करता येत नाही म्हणून हे निवेदन पाठवले असल्याचे सांगून ते म्हणाले की या योजनेसाठी आपण मंत्रालयापर्यंत अनेक हेलपाटे मारले आहेत. अनेक आंदोलने केली आहेत. किमान आता तरी शासनाला जाग येईल अशी आशा आहे तरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन ही योजना त्वरित पूर्ण करावी असे त्यांनी नमूद केले.