प्रतिनिधी / शिरोळ
दहा-पंधरा दिवसापूर्वीच घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना जांभळी ता शिरोळ येथे घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मयत गणेश संभाजी चिवटे वय वर्ष 25 रा माळभाग जांभळी ता. शिरोळ हा एकटाच राहत होता. आई-वडील वारले आहेत, गावातच एक बहिण आहे.
दहा-पंधरा दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याने मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळून आला आहे. शेजारी राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी वास आल्याने याची कल्पना पोलिसांना देण्यात आली. पो हे का सागर पाटील यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून मृत्यूचे कारण अधिक तपास सागर पाटील हे करीत आहेत.