प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शनिवारी 24 तासांत 41 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण मिळाले होते, रविवारी दुसऱया दिवशी सांयकाळपर्यत 24 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 963 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह रूग्णांत 12 महिला, 10 पुरूषांचा समावेश आहे. गडहिंग्लजमधील 7, इचलकरंजीतील 5, चंदगडमधील 5, शिरोळ 2, राधानगरी 2 आणि करवीर तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
जिल्हय़ात रविवारी सायंकाळी पहिल्या टप्प्यात आलेल्या 6 पॉझिटिव्ह रूग्णांत शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील 75 वर्षीय वृद्धा, हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील हत्ती चौकातील 20 वर्षीय तरूण, जय भवानी कॉलनी, शेळके गल्ली येथील 28 वर्षीय तरूण, गावभागातील 53 वर्षीय पुरूष, 47 वर्षीय पुरूष, इचलकरंजीत सोडके मळा येथील 37 वर्षीय महिला, कुडचे मळा येथील 52 वर्षीय पुरूष, 20 वर्षांचा तरूण, कोरोची तानाजी चौक येथील 28 वर्षीय महिला, चंदगड तालुक्यातील कन्नूर बुद्रुक येथील 36 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
सायंकाळी 7 वाजता दुसऱया टप्प्यात आलेल्या 16 पॉझिटिव्ह रूग्णांत गडहिंग्लज तालुक्यातील 23 वर्षीय तरूणी, 36 वर्षीय महिला, 41 वर्षीय महिला, 31 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय तरूण, 70 वर्षीय वृद्ध, 38 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. चंदगड तालुक्यातील 48 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महिला, 79 वर्षीय वृद्ध, 20 वर्षीय तरूणी, 40 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. राधानगरी तालुक्यातील 28 वर्षीय तरूण, 68 वर्षीय महिला तर शिरोळ तालुक्यातील 14 वर्षांची मुलगी, 11 वर्षांचा मुलगा पॉझिटिव्ह आहे. करवीर तालुक्यातील 31 वर्षीय पुरूष पॉझिटिव्ह आहे.
पेठवडगाव लाटवडे रोड येथील 37 वर्षीय पुरूष, भुयेवाडीतील 31 वर्षीय पुरूष, राधानगरीतील ठिकपुर्ली येथील 28 वर्षीय तरूण, फेजिवडे येथील 68 वर्षीय वृद्धा, गडहिंग्लज तालुक्यातील तुपारेवाडेतील 38 वर्षीय पुरूष, शिरोळ तालुक्यात नांदणी येथील 14 वर्षांची मुलगी, 11 वर्षांचा मुलगा, चंदगड तालुक्यातील मोरेवाडी येथील 48 आणि 45 वर्षांचे पुरूष, खेरीवडे येथील 79 वर्षीय वृद्धा, शिनोळी येथे 40 वर्षीय महिला, 20 वर्षांची तरूणी पॉझिटिव्ह आहे.
जिल्हय़ात 743 जण कोरोनामुक्त
दिवसभरात परजिल्ह्यातून जिल्हय़ात आलेल्या 2 हजार 125 जणांची तपासणी केली. त्यातील 877 जणांचे स्वॅब घेण्यात आले. संशयित 396 जणांना आयसोलेट केले आहे. रात्री 9 पर्यत मिळालेल्या 894 स्वॅब रिपोर्टपैकी 36 पॉझिटिव्ह आले असून 843 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच 6 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 743 झाली आहे. रात्रीपर्यंत 22 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी पाठवलेले 6 अहवाल पॉझिटिव्ह तर 3 नाकारले आहेत, 5 प्रलंबित आहेत. आजअखेर 963 पॉझिटिव्हपैकी 743 जणांना डिस्चार्ज दिला आहे. जिह्यात 207 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी रविवारी दिली.
रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत 22 पझटिव्हमध्ये चंदगड 6, गडहिंग्लज 1 हातकणंगले 1, करवीर 1, राधानगरी 2, शिरोळ 2 व नगरपालिका क्षेत्र 9 यांचा समावेश आहे. आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 87, भुदरगड 76, चंदगड 111, गडहिंग्लज 110, गगनबावडा 7, हातकणंगले 18, कागल 58, करवीर 30, पन्हाळा 29, राधानगरी 73, शाहूवाडी 187, शिरोळ 12, नगरपालिका क्षेत्र 86, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 59 असे 943 आणि पुणे 2, सातारा 2, सोलापूर 3, मुंबई 4, नाशिक 1, कर्नाटक 7 आणि आंध्र प्रदेश 1 असे इतर जिल्हा व राज्यातील 20 मिळून 963 रुग्णसंख्या आहे. 963 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 743 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोनाने 13 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल जिह्यातील रूग्णांची संख्या 207 इतकी आहे, असे डॉ. केम्पीपाटील यांनी सांगितले.