कोल्हापूर शहरात 37 रूग्ण, चार डॉक्टरांचा समावेश, पोलीस, महापालिका चालक बाधित; सांगवडे, शिये आणि उचगाव येथील तिघांचा मृत्यू,
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यत 177 पॉझिटिव्ह रूग्ण झाले. कोरोनाने करवीर तालुक्यातील तिघांचा बळी घेतला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 68 झाली आहे. शहर, इचलकरंजीसह करवीर, शिरोळ, हातकणंगले तालुक्यात रूग्णसंख्या वाढत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोरोना नियंत्रणाचा आढावा घेतला. दरम्यान, शहरातील चार डाक्टरांसह, महापालिकेतील चालक, जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस केरोना पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हय़ात मंगळवारी करवीर तालुक्यातील सांगवडे येथील 91 वर्षीय पुरूष, शिये येथील 62 वर्षीय पुरूष आणि उचगाव येथील 70 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. यातील शिये आणि उचगाव येथील मृतांचा मृत्यूनंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मृतांच्या कुटुंबियांसह, अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्यांना कोरोंटाईन केले आहे.
सकाळी 10 वाजेपर्यत 27 पॉझिटिव्ह रूग्णांत शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर, कुरूंदवाड, करवीर तालुक्यातील शिये, केर्ली, खांटागळे, खुपीरेतील 1, शिंगणापुरातील 3, पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथील 3, शहरातील कसबा बावडा, फुलेवाडी 2, कदमवाडी 1, बापट कॅम्पमधील महिला डॉक्टर, पाचगाव, इचलकरंजीतील पंतनगर येथील रूग्णांचा समावेश आहे.
दुपारी 2 वाजेपर्यत आलेल्या 36 रूग्णांत चंदगड तालुक्यातील शिनोळी, कुदनूर, हलकर्णी, धुमाळेवाडी, शाहूवाडीतील परळी, कापशी, सोनवडे प्रत्येकी 1, खुटाळेवाडी 3, गडहिंग्लज 1, हलकर्णी 1, हिरलगे 2, शिरोळ तालुक्यातील घोसरवाड 4, जयसिंगपूर 1, खिद्रापूर 1, राधानगरी येथील 2, करवीर तालुक्यातील गांधीनगर 3, वडणगे 1 यांचा समावेश आहे.
हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील सिद्धार्थ सोसायटी 4, संत मळा, मंगळवार पेठ, कडापुरे गल्ली 2, पेटकरी गल्ली 1, गुरूकन्नानगर, मणेर मळा, देवमोरे गल्ली, कबनूर केटकाळे गल्ली 4, जवाहरनगर 4, कोरवी गल्ली, भोने मळा, पुजारी मळा, आर. के. नगर, आंबेडकरनगर, दत्तनगर, कबनूर, मुसळे स्कूल परिसर येथील 1, यशवंत कॉलनी 3 अशा 29 जणांचा समावेश आहे. हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले, रेंदाळ येथील 2 आहेत. शहरातील जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, उमा टॉकीज चौक, राजारामपुरी, हरिओमनगर आणि टिंबर मार्केट येथील रूग्णांचा समावेश आहे.
दुपारी साडेतीन वाजता आलेल्या 44 पॉझिटिव्ह रूग्णांत शहरातील ताराबाई पार्क ओंकार अपार्टमेंटमधील 6, राजारामपुरी चौथी गल्ली 2, अकरावी गल्ली, आपटेनगर, आर. के. नगर, सम्राटनगर, सुतार मळा 2, सिद्धार्थनगर येथील एकाचा समावेश आहे. करवीर तालुक्यातील परिते 1, गांधीनगर 5, हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले 1, रूकडी, हुपरी, रेंदाळ, रांगोळी प्रत्येकी 1, इचलकरंजी चंदूर रोड परिसरातील 12, पन्हाळा तालुक्यातील कणेरी कोतोली 1, शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूरातील 10, सातारा शनिवार पेठेतील एकाचा समावेश आहे.
सायंकाळी साडेसात वाजता आलेल्या 11 पॉझिटिव्ह रूग्णांत शहरातील शुक्रवार पेठ, कसबा बावडा 2, करवीरमधील सांगवडे, गांधीनगर 2, राधानगरीतील राशिवडे 2 आणि हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील 5 जणांचा समावेश आहे.
आजअखेर 1050 जणांना डिस्चार्ज ः डॉ. केम्पीपाटील
मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 309 प्राप्त अहवालापैकी 233 निगेटिव्ह तर 65 पॉझिटिव्ह आहेत. ऍटीजेन चाचणीच्या 53 प्राप्त अहवालापैकी 36 निगेटिव्ह तर 17 पॉझिटिव्ह आहेत. आजअखेर 2 हजार 565 पॉझिटिव्हपैकी 1 हजार 50 जणांना डिस्चार्ज दिला आहे. जिह्यात 1 हजार 450 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
प्राप्त 65 पॉझिटिव्हमध्ये हातकणंगले 5, करवीर 13, पन्हाळा 8, शिरोळ 2, नगरपालिका क्षेत्र 28, महापालिका क्षेत्र 25 व इतर 1 असा समावेश आहे. आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 100, भुदरगड 85, चंदगड 315, गडहिंग्लज 161, गगनबावडा 7, हातकणंगले 107, कागल 70, करवीर 281, पन्हाळा 108, राधानगरी 91, शाहूवाडी 223, शिरोळ 70, नगरपालिका क्षेत्र 563, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 340 असे 2 हजार 521 आणि अन्य 44 असे एकूण 2 हजार 565 रुग्णसंख्या आहे. 65 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल रूग्णसंख्या 1450 इतकी आहे.