मृतांमध्ये साजणी, पाचगाव, इचलकरंजी, हुपरी येथील रूग्णांचा समावेश,
पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 10 नंतर 208 वर,
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात बुधवारी रात्री 8 पर्यत 208 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. साजणी, पाचगाव, इचलकरंजी, हुपरी येथील 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. अन्य दोन बळींमुळे कोरोना बळींची संख्या 74 वर पोहोचली आहे. आजपर्यतच्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3 हजारांवर गेली आहे. दोन दिवसांत वाढलेली रूग्णसंख्या, बळींमुळे सामुहिक संसर्गाची शक्यता व्यक्त होत होती. त्याला शासकीय सुत्रांनीही दुजोरा दिला आहे.
जिल्हय़ात बुधवारी हातकणंगले तालुक्यातील साजणी येथील 55 वर्षीय पुरूषाचा शहरातील खासगी रूग्णालयात कोरोनाने मृत्यू झाला. पाचगाव रायगड कॉलनी येथील 73 वर्षीय वृद्धेचा सीपीआरमध्ये कोरोनाने मृत्य़ू झाला. इचलकरंजीतील मंगळवार पेठेतील 73 वर्षीय पुरूषाचा कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असता मृत्यू झाला. तो कोरोना पॉझिटिव्ह होता. हुपरीतील चिटणीस बोळ येथील 48 वर्षीय व्यक्तीचा कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. सीपीआरमध्ये सायंकाळी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतला आहे. दिवसभरातील या 6 बळींमुळे कोरोना बळींची संख्या 74 वर पोहोचली आहे. दरम्यान, रात्री 9 वाजेपर्यत जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 261 झाली होती. त्यात कोल्हापूर शहरातील 107 रूग्णांचा समावेश आहे.