प्रतिनिधी / कोल्हापूर
पहिल्या टप्प्यात 17, एक दुसऱ्या टप्प्यात 25 आणि सात अशी रुग्ण संख्या आहे. दुपारी दोन नंतर आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील 13 आणि करवीर तालुक्यातील बारा रुग्ण आहेत. त्यामध्ये गांधीनगर येथील सहा वर्षांची मुलगी, 41 वर्षाचा पुरुष, शहरातील टिंबर मार्केट येथील ऐंशी वर्षांचा वृद्ध, 39 वर्षांची महिला, करवीर तालुक्यातील उचगाव येथील 15 वर्षाची मुलगी, 30 वर्षांची महिला, गांधी नगर साई मंदिर येथील 30 वर्षांचा पुरुष, 52 वर्षांचा पुरुष, वळीवडे येथील 35 वर्षीय पुरुष, गांधीनगर येथील 22 वर्षांची महिला, आंबेवाडी पाटील गल्ली येथील साठ वर्षे महिला, शिंदेवाडी येथील बारा वर्षे मुलगा, गांधीनगर येथील 53 वर्षे पुरुष, चिंचवड येथील 40 वर्षीय महिला, शहरातील जाधववाडी येथील 51 वर्षीय महिला , फुलेवाडी येथील 36 वर्षीय महिला, टिंबर मार्केट येथील 13 वर्षीय मुलगी, 15 वर्षीय मुलगा, 15 वर्षाचा तरुण, 32 वर्षांचा पुरुष, 30 वर्षांची महिला, 30 वर्षांचा पुरुष आणि 85 वर्षांचा वृद्ध यांचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यातील सात रुग्णांमध्ये चंदगड तालुक्यातील तांबीळवाडी येथील 38 वर्षीय महिला, इचलकरंजी गणेश नगर चौथी गल्ली येथील 57 वर्षीय पुरुष, पन्हाळा तालुक्यातील कणेरी येथील 68 वर्षीय पुरुष, शिरोळ तालुक्यातील जांभळी येथील 32 वर्षे पुरुष, शाहूवाडी तालुक्यातील मान येथील आठ वर्षाची मुलगी, करवीर तालुक्यातील 15 जण पॉझिटिव्ह, मलकापूर येथील 22 वर्षीय महिला, कोल्हापूर शहरातील बोंद्रे नगर येथील 29 वर्षे पुरुष आणि इचलकरंजी पाटील मळा येथील वृद्धांचा समावेश आहे. इचलकरंजी येथील 62 वर्षीय वृध्द पॉझिटिव्ह आला आहे.