प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात गेल्या 24 तासात 941 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना रुग्णांची आजपर्यंतची संख्या 30 हजारांवर गेली आहे. दिवसभरात 27 जणांचा कोरोनाने बळी गेला. एकूण बळींची संख्या 934 झाली आहे. दिवसभरात 449 जण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्तांची संख्या 19 हजार 325 झाली आहे. जिल्हय़ात सध्या 10 हजार 791 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्हय़ात मंगळवारी 1 हजार 668 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 259 जणांचे स्वॅब तर 775 जणांची अँटिजेन टेस्ट घेण्यात आली. सायंकाळपर्यंत शेंडा पार्क येथील लॅबमधून 1 हजार 883 जणांचे रिपोर्ट आले. त्यामध्ये 1 हजार 342 निगेटिव्ह तर 518 पॉझिटिव्ह होते. अँटिजेन टेस्टचे 775 रिपोर्ट आले. त्यामध्ये 627 निगेटिव्ह असून 148 पॉझिटिव्ह होते.
जिल्हय़ात मंगळवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये राधानगरी येथील महिला, नेर्ली करवीर येथील पुरूष, चंदगड नागर्डे येथील पुरूष, कदमवाडी येथील पुरूष, लक्ष्मीनगर इचलकरंजी येथील पुरूष, सरनोबतवाडी येथील पुरूष, चंदगड येथील महिला, कळंबा करवीर येथील पुरूष, शाहूपुरीतील महिला, सावर्डे हातकणंगले येथील पुरूष, कदमवाडी येथील पुरूष, रेंदाळ हातकणंगले येथील पुरूष, सावर्डे कागल येथील पुरूष, कुरणी कागल येथील महिला, सावरवाडी करवीर येथील पुरूष, शिवाजी पेठेतील पुरूष आणि इचलकरंजी आसरानगर येथील पुरूषाचा मृत्यू झाला.
इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये इचलकरंजी येथील पुरूष, यड्राव येथील पुरूषाचा तर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात गडहिंग्लज तालुक्यातील बसरगे येथील पुरूषाचा मृत्यू झाला. कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटल्समध्ये ताराबाई पार्क येथील पुरूष, दानोळी शिरोळ येथील पुरूष, राजारामपुरीतील महिला, जुना बुधवारपेठेतील महिला, पोवारवाडी कराड येथील पुरूष, जाधववाडी येथील पुरूष आणि कोडोली पन्हाळा येथील पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला.
जिल्हय़ात दिवसभरात आढळलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या
आजरा 26, भुदरगड 5, चंदगड 18, गडहिंग्लज 35, गगनबावडा 2, हातकणंगले 94, कागल 89, करवीर 90, पन्हाळा 28, राधानगरी 26, शाहूवाडी 44, शिरोळ 43, नगर पालिका क्षेत्रात 98 तर कोल्हापूर शहरात 301 व अन्य 42 जणांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांनी दिली.