प्रतिनिधी / कोल्हापूर
पुणे, मुंबईसह राज्यातील विविध जिल्हय़ातून कोल्हापूर जिल्हय़ात येणाऱया व्यक्तींची संख्या गेल्या आठ दिवसांत वाढली आहे. त्यातून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णही वाढत आहेत. सोमवारी रात्री पर्यत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा काही प्रसारमाध्यमांतून (तरुण भारत नव्हे) 101 असल्याचे प्रसिद्ध झाल्याने जिल्हय़ात घबराट निर्माण झाली आणि गोंधळही उडाला. जिल्हा प्रशासन धास्तावले. याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली असता. जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंतची कोरोना पॉझिटिव्हची अधिकृत आकडेवारी 83 असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य प्रशसानाच्या स्पष्टोक्तीमुळे जिल्हय़ातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येचे शतक झाले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी यांनी सांगितले की ः आरोग्य प्रशसानाच्या अधिकृत आकडेवारीनुसार मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हय़ातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 83 आहे. काही माध्यमांतून (तरुण भारत नव्हे) प्रसिद्ध झालेले कोरोना पॉझिटिव्हचे आकडे हे चुकीचे असून निराधार आहेत.
‘तरुण भारत’च्या संयमित वार्तांकनाचे स्वागत
कोरोना आपत्ती काळातील वार्तांकन व पॉझिटिव्ह रूग्णांच्या संदर्भातील आकडेवारी दै. तरुण भारत नेहमीच संयमाने आणि अधिकृत माहितीच्या आधारे देत आले आहे. अचूक माहिती देत असताना समाजात घबराट पसरणार नाही याची पूर्णपणे दक्षताही ‘तरुण भारत’ घेत आला आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासन जी माहिती व आकडेवारी जाहीर करते. तीच माहिती व आकडेवारी अधिकृत आणि खरी समजली जाते. तरुण भारतच्या विश्वासार्ह बातमीदारीबद्दल वाचकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
…………………………………………………………………………………………………..
जिल्हय़ात पॉझिटिव्ह रूग्ण संख्या ः 83 ः मृत संख्या 2
(आकडेवारी मंगळवार 19 मे सकाळी 10 पर्यंत)
…………………………………………………………………………………………………..
तालुका निहाय कोरोना पॉझिटिव्ह असे ः
तालुका संख्या
आजरा 6
भुदरगड 9
चंदगड 4
गडहिंग्लज 3
गगनबावडा 0
हातकणंगले 0
कागल 1
करवीर 2
पन्हाळा 8
राधानगरी 9
शाहूवाडी 18
शिरोळ 1
नगरपालिका हद्द 6
कोल्हापूर मनपा हद्द 13
इतर जिल्हा 3
……………………………………………………………………….
एकूण 83