सांगरूळ / प्रतिनिधी
कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. मेळाव्यात कोल्हापूर शहर अध्यक्ष तथा जुन्या काळातील कुस्तीचे ठेकेदार पै.बाबासाहेब राजे महाडिक यांना “जीवन गौरव पुरस्कार” देण्याचा ठराव सम्मत करण्यात आला. यासह कुस्ती मल्लविद्या महासंघाचाराज्यस्तरीय मेळावा १० जानेवारी २०२० रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपस्थित पदाधिकाऱ्यांची कुस्तीमल्लविद्या महासंघाची पुढील ध्येय धोरण यावर सखोल चर्चा झाली. कै. पै. खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतरच्या नियोजनाबाबत चर्चा झाली .
यावेळी कुस्ती मल्लाविद्या महासंघ अध्यक्ष पै. गणेश मानुगडे, उपाध्यक्ष राहूल जाधव, मुख्य प्रवक्ता पै. संग्राम कांबळे, कोल्हापूर जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील, शहराध्यक्ष बाबाराजे महाडिक जिल्हा सरचिटनिस डॉक्टर पोवार तसेच सर्व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.