कबनूर / वार्ताहर
कोणाशीही आघाडी न करता स्व बळावर कबनू रातील सर्वच्या सर्व जागा कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीच्या वतीने लढविणार असल्याची घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी नुकतीच कबनूर येथे केले. कबनूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबनूर येथील ताराराणी आघाडीच्या कार्यालयात कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक झाली. त्यावेळी ते बैठकीत बोलत होते.
जिल्हा परिषदेचे सदस्य व युवा नेते राहुल आवाडे यांची उपस्थिती होती. आमदार आ वाडे म्हणाले कबनूर गावची ग्रामपंचायत निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ताराराणी पक्ष कार्यालयात सुपूर्द करावे असे सांगून गावची निवडणूक ही कुणाबरोबरही युती न करता स्वबळावर निवडणूक लढ विण्याचा निर्धार केला आहे. तेव्हा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.
पाणी रस्ते लाईट यासह अन्य नागरी सुविधा गावाला देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे यापुढेही गावाला याहून अधिक सुविधा देण्यासाठी आपल्या पाठीशी आहेअसे ते ठामपणे सांगितले. स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच मधुकर मणेरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, सुधाकर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.बैठकीला माजी उपसरपंच रावसो खवरे ,बबन केटकाळे, कुमार कांबळे, निलेश पाटील, बी एस पाटील यांच्यासह ताराराणी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आभार प्रदीप मनेरे यांनी मानले . फोटो ओळ कबनूर येथे कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडीची बैठक झाली या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश आवाडे व बाजूला राहुल आवाडे इतर मान्यवर.