कोविड रुग्णालयांमधील व्हेंटीलेटरसह यंत्रसामुग्रीकरीता सर्वाधिक साडे चार कोटी,महापालिकेला पावणे दोन कोटी रुपये
कोल्हापूर / प्रवीण देसाई
कोरोना उपाययोजनांसाठी एप्रिल ते मे या दोन महिन्यांच्या कालावधित जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 20 कोटी 96 लाखाचा निधी वितरीत करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेला आवश्यक वैद्यकिय साहित्य, उपकरणे, औषधे, ऑक्सिजन आदींसाठी हा निधी देण्यात आला आहे. सर्वाधिक 4 कोटी 50 लाखांचा निधी कोविड रुग्णालयांमध्ये व्हेंटीलेटरसह इतर यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी दिला आहे. तसेच महापालिकेलाही कोविड सेंटर्ससाठी पावणे दोन कोटी रुपये दिले आहेत.
कोरोना उपाययोजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. राज्य सरकारकडून जिह्यासाठी 2021-22 या वर्षाकरीता 375 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये सरकारने एकूण मंजूर निधीच्या 10 टक्के निधी हा कोरोनासाठी खर्च करावा असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 37 कोटी 5 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातील 20 कोटी 96 लाख रुपये एप्रिल व मे या दोन महिन्यात जिल्हा नियोजन समितीकडून जिह्यातील आरोग्य यंत्रणेला वितरित करण्यात आले आहेत. ऑक्सिजन जनरेटर प्लांट, जनरेटर प्लांट विद्युत पुरवठा, ऑक्सिजन पाईपलाईन, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, डÎुरा सिलेंडर, जंबो सिलेंडर, ऑक्सिजन प्लांट येथे सीसीटीव्ही आदींसाठी हा निधी दिला जात आहे.
कोविड रुग्णालयांतील यंत्रसामुग्रीसाठी साडेचार कोटी
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोविड रुग्णालयांकरीता यंत्रसामुग्री खरेदीसाठी साडेचार कोटी रुपये जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे देण्यात आले आहेत. यामध्ये व्हेंटीलेटर 10, मल्टीपॅरा मॉनिटर 20, सिरींज इन्फ्युशन पंप 55, ऑक्सिजन कॉन्सेस्ट्रेटर 342 यांचा समावेश आहे. या कामासाठी 11 मे रोजी प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे.
महापालिका कोविड सेंटर्ससाठी 1 कोटी 71 लाख
कोविड सेंटर्सच्या आवश्यक वैद्यकिय साधनसामुग्रीसाठी महापालिकेला 1 कोटी 71 लाख 31 हजार रुपये महापालिका प्रशासकांकडे देण्यात आले आहेत. यामध्ये वैद्यकिय सामुग्री संख्या 18, सर्जिकल साहित्य संख्या 19, जंबो सिलेंडर रिफलिंग संख्या 4000, डयुरा सिलेंडर रिफलिंग संख्या 700, कोविड सेंटरसाठी औषध खरेदी संख्या 8, विविध प्रकारची औषधे संख्या 37, आग प्रतिबंधक उपकरणे व वॉर्ड सिलेंडर खरेदी संख्या 800 आहे. या कामासाठी 14 मे रोजी प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे.
`सीपीआर’ येथे ऑक्सिजन प्लांटसाठी 1 कोटी 96 लाख
छत्रपती प्रमिलाराजे सर्वेपचार रुग्णालय (सीपीआर) येथे 300 सिलेंडर प्रतिदिन क्षमतेच्या ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यांना1 कोटी 96 लाख 24 हजार रुपये निधी देण्यात आला आहे. त्यासाठी प्रशासकिय मान्यता 11 मे रोजी दिली आहे.
`आयजीएम’ येथे ऑक्सिजन प्लांटसाठी 1 कोटी 30 लाख
इचलकरंजी येथील `आयजीएम’ रुग्णालय येथे 200 सिलेंडर प्रतिदिन क्षमतेच्या ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यांना1 कोटी 30 लाख 83 हजार रुपये निधी देण्यात आला आहे. या कामासाठी 11 मे रोजी प्रशासकिय मान्यता दिली आहे.
कोविड रुग्णालयांना जंबो सिलेंडरसाठी 99 लाख
कोविड रुग्णालयांकरीता आवश्यक जंबो सिलेंडर पुरविण्यासाठी 99 लाख 53 हजार 405 रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याची प्रशासकिय मान्यता 11 मे रोजी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेला 86 लाख रुपये
जिल्हा परिषदेला कोरोना उपाययोजनांसाठी 86 लाख 97 हजार रुपये निधी देण्यात आला आहे. यामध्ये कोविड सेंटरसाठी आवश्यक वैद्यकिय यंत्रसामुग्रीसाठी 30 लाख रुपये व कोविड सेंटरसाठी औषधे व प्रयोगशाळा साहित्य खरेदीसाठी 50 लाख रुपये देण्यात आले आहेत. यासाठी 16 मे रोजी प्रशासकिय मान्यता देण्यता आली आहे. तसेच संजय घोडावत विद्यापीठ कोविड सेंटर येथे ऑक्सिजन टँक ते मॅन फोल्ड ऑक्सिजन पाईप बसविण्यासाठी 1 लाख 63 हजार व कानूर (ता. चंदगड) येथे प्राथमिक आरोग्य पेंद्र येथे 30 खाटांसाठी ऑक्सिजन सिस्टिम बसविण्यासाठी 5 लाख 34 हजार रुपये दिले आहेत. यासाठी 14 मे रोजी प्रशासकिय मान्यता दिली आहे.
राज्य सरकारने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिह्यासाठी मंजूर केलेल्या एकूण निधीपैकी 30 टक्के निधी कोरोना उपाययोजदेण्यातनांसाठी खर्च करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार आतापर्यंत 20 कोटी 96 लाख रुपये विविध कामांसाठी आरोग्य यंत्रणांना दिले आहेत. मागणी येईल त्याप्रमाणे निधी दिला जात आहे.-विजय पवार, जिल्हा नियोजन अधिकारी