अध्यक्षपदी हसन मुश्रीफ, तर उपाध्यक्षपदी राजूबाबा आवळे
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब झालं आहे. शासकीय विश्रामगृहा येथे झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफ तर उपाध्यक्षपदी आमदार राजूबाबा आवळे यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ,पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेश पाटील, नूतन संचालक माजी खासदार निवेदिता माने, रणजीत सिंह गायकवाड, ए. वाय. पाटील, श्रुतिका काटकर यांच्यासह अन्य संचालक उपस्थित होते.
दरम्यान, संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज दुपारी तीन वाजता दोन्ही उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहेत.