कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील आणि आमदार विनय कोरे यांनी प्रतिष्ठेच्या ठरवलेल्या प्रक्रिया संस्था गटात विद्यमान संचालक व विरोधी पॅनेलचे प्रमुख शिवसेना खासदार प्रा. संजय मंडलिक व संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. खासदार संजय मंडलिक, संचालक बाबासाहेब पाटील यांच्या विजयाने सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे.