निवडेतील श्री महालक्ष्मी विकास सेवा संस्थेने बँकेला दिले निवेदन
प्रतिनिधी / असळज
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत नेहमीच शेतकऱ्यांना मदत होते. सध्या कोरोनाच्या महामारीच्या कालावधीत ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना व्हेटिंलेटर किंवा ऑक्सिजन बेड वेळत मिळत नसल्यामुळे उपचार कमी पडत आहेत. उपचाराअभावी काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
या बाबीचा विचार करुन जिल्हा मध्यवर्ती बँकेने कोविड केअर सेंटर सुरू करावे. अथवा सध्या कार्यरत असलेल्या केअर सेंटरमध्ये बँकेमार्फत व्हेंटिलेटर बेड द्यावेत अशी मागणी गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील श्री महालक्ष्मी विकास सेवा संस्थेने बँकेकडे केली आहे. बँकेचे कार्यकारी संचालक ए. बी. माने यांना मागण्यांचे निवेदन दिले. संस्थेचे संस्थापक चेअरमन निलेश म्हाळुंगेकर यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेचे व्हाईस चेअरमन ताजुद्दीन तरटे, संचालक सुजित खोराटे, शिवाजी राऊत, महावीर हांडे, सचिव आनंदा पाटील यांनी निवेदन दिले.