2 मृत्यू, 48 नवे रूग्ण, 76 कोरोनामुक्त,जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 96.91 टक्के
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व्यक्तोचा समावेश आहे. दिवसभरात 48 नवे रूग्ण आढळले तर 76 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 590 आहे. दरम्यान, जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 96.91 टक्क्यांवर पोहोचला आहे. तो 97 टक्क्यांवर पोहोचल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 3 टक्क्यांखाली आला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे आणि कागल तालुक्यातील सावर्डे येथील व्यक्तीचा मृत्यू झाला. शहर आणि परजिल्ह्यातील कोरोना मृत्यू नोंद निरंक राहिली. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 759 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3 हजार 83, नगरपालिका क्षेत्रात 826, शहरात 1 हजार 249 तर अन्य 601 आहेत. दिवसभरात 76 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 99 हजार 460 झाली आहे. गेल्या 24 तासांत 48 नवे रूग्ण आढळले.
यामध्ये आजरा 1, भुदरगड 1, चंदगड 0, गडहिंग्लज 1, गगनबावडा 2, हातकणंगले 3, कागल 2, करवीर 2, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 2, शिरोळ 3, नगरपालिका क्षेत्रात 2, कोल्हापुरात 25 तर परजिल्ह्Îातील तिघांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 5 हजार 809 झाली आहे. जिल्ह्यात चंदगड, राधानगरी तालुक्यात नवी रूग्ण संख्या नोंद शुन्य राहिली. सद्यस्थितीत शहरात 8 आणि ग्रामीण भागात 220 जण होम कोरोंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
कोरोना रूग्ण ः 48 एकूण ः 2,05,809
कोरोनामुक्त ः 76 एकूण ः 1,99,460
कोरोना मृत्यू ः 2 एकूण मृत्यू ः 5759
सक्रीय रूग्ण ः 590