प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच आज, बुधवारी पुन्हा आठ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत आढळलेल्या आठ रुग्णांमध्ये कागल तालुक्यातील 38 वर्षे पुरुष, करवीर तालुक्यातील अठरा वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला 65 वर्षाच्या वृध्देचा समावेश आहे. तर, हातकणंगले तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष तर गडहिग्लज तालुक्यातील 80 वर्षाच्या वृध्द नागरिकाचासमावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 759 वर पोहचली आहे.