प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम आहे. गेल्या काही दिवसापासून ही संख्या वाढतच असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल, शुक्रवारी रात्री उशिरा 270 रुग्णांची भर पडली होती तर तिघांचा मृत्यू झाला होता.
आज, जिल्ह्यात शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत 42 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने यात आणखी भर पडली आहे. यामध्ये राधानगरी, पन्हाळा, करवीर, भुदरगड, हातकणंगले, गडहिग्लज तालुक्यातील रुग्णाचा समावेश आहे. तर कोल्हापूर महापालिका हद्दीतील काही रुग्णांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील भोसले वाडी, लक्षतीर्थ वसाहत, कसबा बावडा, एसएससी बोर्ड, वारे वसाहत आणि अन्य दोन भागातील हे रुग्ण आहेत. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह संख्या 1922 वर पोहचली आहे.