प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही केला कमी होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसापासून दिवसाला हा आकडा शंभरच्या वर जात आहे. काल उच्च्चांकी 331 रुग्णांची भर पडली होती. तर आज, शनिवारी दुपारपर्यंत आणखी 35 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर चार वाजेपर्यंत 23 तर आणखी काही वेळातच परत 74 रुग्णांची भर पडली. यामुळे आतापर्यंत कोरोनाचा हा आकडा 131 वर पोहचला. कोरोनामुळे जिल्ह्यातील 7 जणांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजता आणखी 76 जण पॉझिटिव्ह आले यामध्ये कोल्हापूर शहरातील 56 जणांचा समावेश आहे. यामुळे एकूण पॉझिटिव्हची संख्या 208 झाली आहे.
तर रात्री आठ पर्यंत एका मृत्यूची वाढ झाली असुन एकूण बाधिंतांचा आकडा २०८ वर पोहोचला आहे.
आज, आढळून आलेल्या या 35 रुग्णांमध्ये शहरातील 19 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये मोरे माने नगर चार, मंगळवार पेठ 1, कसबा बावडा 1, उद्यमनगर 2, सोमवार पेठ एक, पाचगाव एक, लाईन बाजार 2, रंकाळा 2, कदमवाडी एक, शिवाजी पेठ एक, राजारामपुरी आठवी गल्ली 2, काटकर कॉलनी राजारामपुरी 2, शाहूपुरी पाचवी गल्ली एक येथील रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय हातकणंगले, गगनबावडा, तालुक्यातील मांडुकली तीन, चंदगड येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात चार वाजेपर्यंत 23 रुग्णांची भर
चार वाजता आणखी 23 रुग्णांची वाढ झाली. आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये राधानगरी तालुक्यातील ११, करवीर तालुक्यातील ३, इचलकरंजीतील ७ आणि कोल्हापूर शहरातील एकाचा समावेश आहे.
सरवडे, राधानगरी, शेळेवाडी, मोहाडे, लाडवाडी, सोन्याची शिरोली, पाडळी, राशिवडे प्रत्येकी एक, शिरगाव चार, गांधीनगर तीन, उचगाव एक, इचलकरंजी सहा, कबनूर एक, जवाहर नगर कोल्हापूर येथील एक अशा रुग्णांचा समावेश आहे.
तर आणखी काही वेळातच 74 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. यामध्ये राधानगरी तालुक्यातील 24, कोल्हापूर शहरातील 39 जणांचा समावेश आहे.
लाईम बाजार ४, अश्विनी हॉस्पिटल 2, सन्मित्र सोसायटी राजारामपुरी 14 वि गल्ली एक, पाचगाव दोन हरिओम नगर एक, जवाहर नगर १, उजळाईवाडी दोन, एस पी ऑफीस पीडब्ल्यूडी विभाग एक, सीपीआर हॉस्पिटल १, जवाहर नगर 1 , यादव नगर 11, टेंबलाईवाडी 3 , नागाळा पार्क 3 , संभाजीनगर एक, सानेगुरुजी वसाहत एक, दौलत नगर 1, टिंबर मार्केट एक, विक्रम नगर एक, जवाहर नगर एक वसगडे 1 , राधानगरी कसबा वाळवे एक, शिये ५, भैरेवाडी पन्हाळा एक, शिरगाव 17 , राशिवडे 8 इचलकरंजी 3
जिल्ह्यात सायंकाळी सहा वाजता आलेल्या 76 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खालील भागातील रुग्णांचा समावेश होतो
इचलकरंजी 3, हुपरी पाच,माणगाव 1 ,रेंदाळ एक ,नागाव 1 आळते दोन रुकडी एकअतिग्रे एकगडहिंग्लज 1जरग नगर 1सम्राट नगर 2
एसएससी बोर्ड 1, लक्षतीर्थ वसाहत सुतार मळा 4,पाचगाव 4,जवाहर नगर 1, टिंबर मार्केट 6,यादव नगर 13, भोसलेवाडी 1, शिवाजी चौक 3,दुधाळी 1, विक्रम नगर 6, कागल केंबळी 1,कसबा बावडा 4, कसबा वाळवे १,साळुंके नगर 1, आर के नगर 1, चंदगड 1, उद्यम नगर 5, शाहू कॉलनी विचारे माळ 1.
कोरोनामुळे जिल्ह्यातील 7 जणांचा मृत्यू झाला.
आज झालेल्या मृतांमध्ये तळगुळ (ता. चंदगड) येथील 64 वर्षाचा वृद्ध, वाकरे (ता. करवीर) येथीला 65 वर्षाचा पुरुष, इचलकरंजी येथील लाखेनगर60 वर्षाचा पुरुष, जुना रोड येथील 69 वर्षाची वृद्धा, कबनुर (ता. हातकणंगले) येथील 46 वर्षाचा पुरुष, हातकणंगले येथील 65 वर्षाचा पुरुष तर मांडुकली (ता. गगनबावडा) येथील 68 वर्षाचा पुरषाचा मृतांमध्ये समावेश आहे.