कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असून आज तब्बल 1 हजार 14 रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात एका दिवसात 12 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तसेच आज कोरोनामुक्त झालेल्या 170 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कोल्हापूर शहरात समूह संसर्गाचा धोका वाढला असून आज शहरात तब्बल 300 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 हजार पार गेली आहे.