नव्या कोरोना रूग्णांची संख्या 200 च्या आत, संशयित 660 रूग्णांची दिवसभरात तपासणी, कोरोनामुक्त संख्या 37 हजारांवर, पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 46 हजारांवर
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 300 जण कोरोनामुक्त झाले तर 167 नवे रूग्ण दिसून आाdनले. दिवसभरात 660 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 302 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. आजपर्यत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 46182 तर कोरोनामुक्तांची संख्या 37593 झाली आहे.
जिल्ह्यात बुधवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 660 जणांची तपासणी केली. सध्या 7 हजार 75 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यत शेंडा पार्क येथील लॅबमधून 755 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 702 निगेटिव्ह तर 53 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 302 रिपोर्ट आले. त्यापैकी 41 पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये खुपिरे करवीर येथील 80 वर्षीय पुरूष, सुभाषनगर कोल्हापूर येथील 60 वर्षीय महिला, बारवे भुदरगड येथील 70 वर्षीय पुरूष, निळेवाडी हातकणंगले येथील 42 वर्षीय पुरूष आणि पाडळी खुर्द करवीर येथील 85 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये कुरूंदवाड येथील येथील 69 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय पुरूष्ग्नााचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटल्समध्ये कसाल कुडाळ सिंधुदुर्ग येथील 62 वर्षीय पुरूष, सासने कॉलनी जवाहरनगर कोल्हापूर येथील 64 वर्षीय पुरूष, येडांबेवाडी चिकोडी बेळगाव येथील 55 वर्षीय पुरूष, नवे पारगाव हातकणंगले येथील 76 वर्षीय पुरूष आणि बिराणवाडी तासगाव सांगली येथील 67 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. जिल्हÎात कोरोनाने आजपर्यत 1 हजार 514 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागात 730, नगरपालिका क्षेत्रात 326, महापालिका क्षेत्रात 342 तर अन्य 116 जणांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासांत 300 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 37 हजार 593 झाली आहे. आजरा 5, भुदरगड 4, चंदगड 10, गडहिंग्लज 5, हातकणंगले 13, कागल 9, करवीर 14, पन्हाळा 9, राधानगरी 2, शाहूवाडी 4, शिरोळ 7, नगरपालिका क्षेत्रात 23, कोल्हापूर शहर 50 आणि अन्य 12 असे 167 रूग्ण असल्याची माहित्ना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.