प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु असून कोरोना बाधितांच्या आकडय़ामध्ये तासगणीक भर पडत आहे. शनिवारी दिवसभरात 47 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिह्यातील कोरोना बाधितांची संख्या 1174 वर जाउन पोहोचला आहे. शहरातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहाराच्या चिंतेत भर पडली आहे.
कोल्हापूर जिह्यातील कोरोना रुग्णंची संख्या गेल्या काही दिवसांत शंभराच्या आत आली होती. मात्र गेल्या 10 दिवसात या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. जिह्यतील कोरोनाबाधितांची संख्या 1174 वर पोहोचली असून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 835 वर पोहोचली आहे. सध्या 315 रुण उपचार घेत आहेत. शनिवारी दिवसभरात 25 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री पासून शनिवारी दिवसभरात 1142 नागरीकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 552 जणांचे स्वॅब घेतले आहेत. शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंत एकूण 539 लोकांचे स्वॅब रिपोर्ट प्राप्त झाले. त्यापैकी 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 539 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी दुसऱया टप्प्यात 429 जणांचे स्वॅब रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 35 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 381 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पहाटे प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये गडहिंग्लज येथील 58 वर्षीय पुरुष, तळसंदे (ता. पन्हाळा) येथील 48 वर्षे पुरुष, शहरातील मिरजकर तिकटी येथील 65 वर्षीय पुरुष, साजणी (ता. हातकणंगले) येथील 39 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सकाळी 10 वाजता प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 9 रुग्णंचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये केरले (ता. करवीर) येथील 43 वर्षीय पुरुष, शहरातील ताराबाई पार्क परिसरातील 45 वर्षीय पुरुष, इचलकरंजीतील सातपुते गल्ली 34 वर्षीय महिला, शहरातील उद्यम नगर येथील 65 वर्षे पुरुष, पोरले (ता. पन्हाळा) येथील 37 वर्षे पुरुष, गांधीनगर (ता. करवीर) येथील 34 वर्षीय महिला, 9 वर्षाची मुलगी, इचलरकंजी येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आटपाडी (जि. सांगली) येथील 40 वर्षे महिला पॉझिटिव्ह आढळली.
दुपारी 3 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 15 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. साजणी (ता. हातकणंगले) येथील 35 वर्षीय पुरुष, वरवडे (ता. करवीर) येथील बत्तीस वर्षे पुरुष 31 वर्षे पुरुष, गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील 28 वर्षीय महिला, 32 वर्षे पुरुष, जोशी गल्ली चिंचवड (ता. करवीर) येथील 39 वर्षे पुरुष, परिते (ता. करवीर) येथील 52 वर्षीय, पुरुष गोकुळ शिरगाव एस टी कॉलनी (ता. करवीर) येथील 65 वर्षे पुरुष, शहरातील फुलेवाडी येथील 51 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, मरळी (जि. सातारा ता. पाटण) येथील 31 वर्षीय पुरुष, शहरातील फुलेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, सोडगे मळा (इचलकरंजी) येथील 45 वर्षे, पुरुष 36 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
सायंकाळी 6 वाजता बारा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील 25 वर्षे तरुण, कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील 35 वर्षे पुरुष, नुल (ता. गडहिंग्लज) येथील 75 वर्षे पुरुष, जैनापुर (ता. शिरोळ) येथील 45 वर्षे पुरुष, कोल्हापूर शहरातील जवाहर नगर येथील तीस वर्षे पुरुष्। बिलवाडी (ता. चंदगड) येथील 55 वर्षीय महिला, 72 वर्षे पुरुष, 75 वर्षे पुरुष, 50 वर्ष पुरुष, कुदनुर येथील 52 वर्षीय पुरुष, लकीवाड येथील 50 वर्षे पुरुष, देवले वाडी येथील 55 वर्षे पुरुष यांचा समावेश आहे.
टिंबर मार्केट येथील 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह
टिंबर मार्केट येथील माजी नगरसेवकाच्या आईच्या अंत्यसंस्कारास गेलेल्या 80 नागरीकांचे स्वॅब आरोग्य विभागाने घेतले होते. यापैकी 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र अद्यापही 48 नागरीकांचे अहवाल येणे बाकी आहेत. यामुळे प्रशासन अद्यापही गॅसवर आहे. या परिसरात समुह संसर्ग होण्याचा धोका बळावला असल्याने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे.
त्या दवाखान्यातील 25 जण निगेटिव्ह
ताराबाई पार्क येथील एका दवाखान्यातील डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तेथील कर्मचारी व रुग्ण असे 25 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 1 कर्मचाऱयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे उर्वरीत 24 जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
कोल्हापूर पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव
कोल्हापूर पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. केर्ली (ता. करवीर) येथील एक कॉन्स्टेबलचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कोल्हापूर पोलीस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तो पोलीस कॉन्स्टेबल पोलीस मुख्यालय, गगनबावडा येथील पोलीस स्टेशनमध्ये काही जणांच्या संपर्कात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
रात्री 8 वाजेपर्यंतची आकडेवारी
एकूण कोरोनाग्रस्त 1174
एकुण कोरोनामुक्त 835
मृत्यू 24
सध्या उपचार घेणारे 315