प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी गेल्या 24 तासांत 15 जण कोरोनामुक्त झाले तर 13 नवे रूग्ण दिसून आले. सध्या सक्रीय रूग्णसंख्या 113 आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात बुधवारी कोरोना मृत्यू निरंक राहिले. कोरोना बळींची संख्या 1,729 झाली आहे. ग्रामीण भागात 849, नगरपालिका क्षेत्रात 348, शहरात 377 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. बुधवारी 15 जण कोरोनामुक्त झाले तर 13 नवे रूग्ण मिळाले. तसेच 113 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 681 जणांची तपासणी केली. कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 196 झाली आहे.
शेंडा पार्क येथील लॅबमधून 834 रिपोर्ट आले. त्यातील 811 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 77 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 166 रिपोर्ट आले, त्यापैकी 156 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 1 चंदगड 0, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 2, कागल 0, करवीर 2, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 6 व अन्य 1 असे 13 रूग्ण आहेत. नव्या 13 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 50 हजार 38 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 13, कोरोनामुक्त 15, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 50 हजार 038
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 196
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 113
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1729
गेल्या 24 तासांत 681 संशयितांची तपासणी