सक्रीय रूग्णसंख्या 321, कोरोना मृत्यू निरंक
कोरोना रूग्ण 43 : एकूण : 50955
कोरोनामुक्त 34 : एकूण : 48883
कोरोना मृत्यू : 0 : एकूण मृत्यू : 1751
सक्रीय रूग्ण : 321
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे 43 नवे रूग्ण दिसून आले तर 34 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 321 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोना बळीची नोंद निरंक राहिली. त्यामुळे बळींची संख्या 1 हजार 751 आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 853, नगरपालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 389 तर अन्य 160 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 34 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 883 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 2, कागल 0, करवीर 5, पन्हाळा 1, राधानगरी 1, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 3, कोल्हापूर शहरात 25 तर अन्य 6 जणांचा समावेश आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून आलेल्या 447 अहवालापैकी 429 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 26 अहवाल आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 231 रिपोर्ट आले. त्यातील 200 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 50 हजार 955 आहेत. त्यापैकी 48 हजार 883 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 321 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.