मागील चोवीस तासात 288 नवे रुग्ण, चौघांचा मृत्यू
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतच निघाला आहे. मागील चोवीस तासात 288 नवे रुग्ण आढळून आले. तर चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील ऍक्टीव्ह रुग्णसंख्या 1464 इतकी झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाकडे मागील चोवीस तासात 1532 संशयितांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. 864 जणांची आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी टेस्ट करण्यात आली. यामधून 135 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. 141 अँटीजेन टेस्ट पैकी 26 जण बाधीत आढळले. तर खाजगी रुग्णालये आणि लॅबकडून प्राप्त झालेल्या 527 अहवालांमधून 127 रुग्ण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. असे एकूण 288 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
गगनबावडा, पन्हाळा प्रत्येकी 1, कागल, राधानगरी शाहूवाडी प्रत्येकी 2, गडहिंग्लज 11, भुदरगड 12, हातकणंगले 13, शिरोळ 16 आणि करवीर तालुक्यात 24 रुग्ण आढळून आले. तर कोल्हापूर शहरात 127 आणि नगरपालिका हद्दीत 41 रुग्ण सापडले. परजिल्हा व राज्यातून आलेले 27 जण कोरोनाबाधित आले आहेत. चंदगड तालुक्यात सलग दुसऱया दिवशी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.