प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी शहरातील महिलेसह दोघांचा कोरोनाचे मृत्यू झाला, दिवसभरात 167 नवे रूग्ण मिळून आले तर 39 जण केरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 1 हजार 540 झाली आहे. कोरोना बळींची संख्या 1800 वर पोहोचली आहे. कोल्हापूर शहरात 67 नवे रूग्ण दिसून आले आहेत.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी यादवनगर येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर कदमवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये गडहिंग्लज येथील 65 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 800 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 870, नगरपालिका क्षेत्रात 353, कोल्हापूर शहरात 406 तर अन्य 171 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 39 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 50 हजार 100 झाली आहे.
गेल्या 24 तासांत 167 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 8, चंदगड 5, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 11, कागल 2, करवीर 22, पन्हाळा 9, राधानगरी 4, शाहूवाडी 4, शिरोळ 9, नगरपालिका क्षेत्रात 14 कोल्हापुरात 67 तर अन्य 11 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 53 हजार 440 झाली आहे.
गुरूवारी 2 हजार 529 जणांची तपासणी केली. त्यातील 254 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. शेंडा पार्क येथून आलेल्या 1 हजार 186 अहवालापैकी 1 हजार 67 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 115 अहवाल आले. त्यातील 98 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 430 रिपोर्ट आले. त्यातील 345 निगेटिव्ह आहेत. सध्या 1 हजार 540 रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात 276 तर ग्रामीण भागात 476 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
Previous Articleपंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.