जिल्ह्यात 1542 पॉझिटिव्ह, 35 बळी, स्थानिक 32, परजिल्ह्यांतील तिघांचा मृत्यू कोल्हापूरकरांसाठी दिलासादायी चित्र, सक्रीय रूग्णसंख्या 14 हजारांकडे
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 542 नवे रूग्ण आढळले. नव्या रूग्णांत वाढ झाली असली तरी कोरोना मृत्यूसंख्येत 25 टक्क्यांनी घट झाली. दिवसभरात 35 जणांचा मृत्यू झाला. त्यात जिल्ह्यातील 32 जण आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 862 झाली. तसेच 961 जण कोरोनामुक्त झाले. कोरोना मृत्यूसंख्येत झालेली घट कोल्हापूरकरांसाठी दिलासादायी चित्र आहे.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 35 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्ह्यातील 32 जण आहेत. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 139 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 586, नगरपालिका क्षेत्रात 511, शहरात 647 तर अन्य 395 आहेत. मृतांत परजिल्ह्यातील तिघे आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 862 झाली आहे. दिवसभरात 961 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 73 हजार 970 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिले.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 542 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 36, भुदरगड 47, चंदगड 45, गडहिंग्लज 93, गगनबावडा 7, हातकणंगले 174, कागल 43, करवीर 191, पन्हाळा 97, राधानगरी 105, शाहूवाडी 22, शिरोळ 94, नगरपालिका क्षेत्रात 187 कोल्हापुरात 325 तर अन्य 76 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 90 हजार 971 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून मंगळवारी 3 हजार 179 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 710 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 3 हजार 181 अहवाल आले. त्यातील 2 हजार 408 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 788 रिपोर्ट आले. त्यातील 490 निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांत परजिल्ह्यातील अथणी बेळगाव येथील 42 वर्षीय पुरूष, 48 वर्षीय पुरूष, मिरज सांगली येथील 78 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील 33 मृत्यूंमध्ये वाघापूर, चंदगड, जयसिंगपूर, गारगोटी, वडगाव, पैजारवाडी, यड्राव, हातकणंगले, माणगाव, अचलापूर, नवा वाशी नाका, इचलकरंजी, पुलाची शिरोली, किणये, भैरेवाडी, बेलेभाट, आर. के. नगर, पेठ वडगाव, म्हारूळ, कळे, आर. के. नगर, जागृतीनगर, खोची, कासारवाडा, उदगिरी, आर. के. नगर, नागदेववाडी, सांगरूळ, लाकूडवाडी येथील व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोना रूग्ण : 1542 एकूण : 90921
कोरोनामुक्त 961 : एकूण : 73970
कोरोना मृत्यू 35 : एकूण मृत्यू : 3139
सक्रीय रूग्ण : 13862