सक्रीय रूग्णसंख्येत हळूहळू घट
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 41 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील 6 आहेत. गेल्या 24 तासांत 1 हजार 247 नवे रूग्ण आढळले. दिवसभरात 1 हजार 213 जण कोरोनामुक्त झाले. सध्या सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 521 आहे. जिल्ह्यात सोमवारी कोरोना मृत्यू, नवे रूग्ण आणि सक्रीय रूग्णसंख्येत घट झाली आहे. प्रशासनासह कोल्हापूरकरांना या आकडेवारीमुळे दिलासा मिळाला आहे. शहरातील वृद्धाश्रमात कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, सव्वा वर्षांनंतर एकूण रूग्णसंख्या आता 1 लाखांवर पोहोचणार आहे.
जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने 41 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये परजिल्ह्यातील 6 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोना बळींची संख्या 3 हजार 391 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 1 हजार 724, नगरपालिका क्षेत्रात 553, शहरात 697 तर अन्य 417 आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 521 आहे. दिवसभरात 1 हजार 213 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 82 हजार 286 झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिले.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 247 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 26, भुदरगड 43, चंदगड 32, गडहिंग्लज 74, गगनबावडा 14, हातकणंगले 153, कागल 16, करवीर 149, पन्हाळा 44, राधानगरी 20, शाहूवाडी 50, शिरोळ 82, नगरपालिका क्षेत्रात 190 कोल्हापुरात 283 तर अन्य 71 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 99 हजार 198 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून सोमवारी 3 हजार 172 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 563निगेटिव्ह आहेत. अँन्टीजेन टेस्टचे 2 हजार 72 अहवाल आले. त्यातील 1 हजार 709निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 978 रिपोर्ट आले. त्यातील 656 निगेटिव्ह आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्यांत परजिल्हय़ांतील 6 जण आहेत. यामध्ये बेळगाव येथील 43 वर्षीय महिला, कारदगा येथील 52 वर्षीय पुरूष, सावंतवाडी येथील 67 वर्षीय पुरूष, कारदगा येथील पुरूष, नॉर्थ गोवा येथील 44 वर्षीय पुरूष, सौंदलगा येथील 36 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
मृतांमध्ये शहरातील 9 जणांचा समावेश
कोरोना मृतांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली, आर. के. नगर, टेंबलाईवाडी, मातोश्री वृद्धाश्रम चंबुखडी, हलकर्णी, साने गुरूजी वसाहत, शुक्रवार पेठ, पुलाची शिरोली, निळे मलकापूर, फुलेवाडी, शहापूर, अवधुतनगर, कोरोची, कुंभोज, माणगाव, रेंदाळ, हिंटणी, हेरे, हुंबरवाडी, कुमरी, कडलगे, उद्यमनगर, लक्षतीर्थ वसाहत, वारणा कोडोली, मोरेवाडी, उचगाव, वडणगे, कणेरी, तळंदगे, संभाजीनगर, करनूर, निगवे दुमाला, मंगळवार पेठ, रूई, जयसिंगपूर येथील व्यक्तींचा समावेश आहे.
आजचे कोरोना रूग्ण 1247 : एकूण : 99198 आजचे कोरोनामुक्त 1213 : एकूण : 82286 आजचे कोरोना मृत्यू 41 : एकूण मृत्यू : 3391 सक्रीय रूग्ण : 13521