कोरोना मृत्यू 28, नवे रूग्ण 1604, कोरोनामुक्त 1219 रूग्णसंख्या 15 हजारांवर, कोरोना मृत्यूमध्ये शह्नार 4, परजिल्ह्यांतील 5,
ग्रामीण भागातील एकूण मृत्यूसंख्या 2 हजारांकडे
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 28 जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत मृत्Îू संख्येत घट झाली आहे. दिवसभरात 1 हजार 604 नवे रूग्ण आढळून आले तर 1 हजार 219 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 15 हजार 927 झाली आहे. कोरोना मृत्यूंमध्ये शहरातील 4 आणि परजिल्ह्यांतील 5 आहेत.
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने 28 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 821 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 1 हजार 987, नगरपालिका क्षेत्रात 598, शहरात 769 तर अन्य 467 आहेत. मृतांमध्ये जिल्ह्यांतील 23 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 219 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 98 हजार 28 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 604 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 57, भुदरगड 33, चंदगड 40, गडहिंग्लज 52, गगनबावडा 1, हातकणंगले 209, कागल 61, करवीर 261, पन्हाळा 167, राधानगरी 27, शाहूवाडी 13, शिरोळ 90, नगरपालिका क्षेत्रात 152, कोल्हापुरात 393 तर अन्य 48 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 17 हजार 776 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून गुरूवारी 2 हजार 654 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 158 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 3 हजार 200 अहवाल आले. त्यातील 2 हजार 733 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 2 हजार 757 रिपोर्ट आले. त्यातील 2 हजार 26 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 8 हजार 612 स्वॅब रिपोर्ट आले.
चौकट
कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 393 1143 1211
आजपर्यतचे बाधीत 33807 73869 1,17,776
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1219 98028
दिवसभरातील मृत्यू 4 24 28
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 769 3052 3821
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 406 2158 2654
अँटीजेन 467 2733 3200
ट्रुनेट 731 2026 2757