कोरोनामुक्तांमध्ये वाढ, सक्रीय रूग्ण, टेस्टिंगमध्ये घट
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 28 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 90 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 433 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 11 हजार 759 झाली आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मंगळवारी कोरोना मृत्यू, रूग्णसंख्येत अधिक घट झाली आहे. कोरोना टेस्टींग घटले असून कोरोनामुक्तांत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 28 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 233 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 236, नगरपालिका क्षेत्रात 645, शहरात 850 तर अन्य 502 आहेत. मृतांमध्ये जिल्ह्यांतील 26 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 433 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 19 हजार 592 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 90 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 44, भुदरगड 46, चंदगड 18, गडहिंग्लज 21, गगनबावडा 1, हातकणंगले 114, कागल 54, करवीर 144, पन्हाळा 82, राधानगरी 35, शाहूवाडी 12, शिरोळ 80, नगरपालिका क्षेत्रात 116, कोल्हापुरात 292 तर अन्य 31 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 35 हजार 584 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून मंगळवारी 2 हजार 635 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 289 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 4 हजार 228 अहवाल आले. त्यातील 3 हजार 684 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 719 रिपोर्ट आले. त्यातील 519 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 7 हजार 582 स्वॅब रिपोर्ट आले.
परजिल्ह्यातील दोघांचा, शहरातील 10 जणांचा कोरोनाने मृत्यू
कोरोनाने बेळगाव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील 10 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृतांमध्ये नाना पाटीलनगर, नेहरूनगर, लक्षतीर्थ वसाहत, संभाजीनगर, मंगळवार पेठ, लक्षतीर्थ वसाहत, आर.के.नगर, संभाजीनगर, हरीपूजा पूरम आणि आर.के.नगर येथील व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोना रूग्ण 1090 ः एकूण ः 1,35,584
कोरोनामुक्त 1433 ः एकूण ः 1,19,592
कोरोना मृत्यू 28 ः एकूण मृत्यू ः 4233
सक्रीय रूग्ण ः 11759