प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात रविवारी रात्रीपर्यत 21 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. आजपर्यत 24 तासांत 21 बळींची नोंद ही उच्चांकी ठरली आहे. तसेच 710 नवे रूग्ण मिळाले आहेत. जिल्हय़ात 216 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 4 हजार 337 झाली आहे. दरम्यान, दुषित वातावरणामुळे कोरोना संशयित रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ऍटीजेन टेस्टची संख्याही प्रशासनाने वाढवल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे.
जिल्हय़ात रविवारी इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये लालनगर येथील 75 वर्षीय वृद्ध, स्वामी मळा येथील 65 वर्षीय वृद्धा, ताकवडे वेश येथील 65 वर्षीय वृद्धा, शहापूर रोड येथील 70 वर्षीय वृद्धा, वेताळ पेठ येथील 54 वर्षींय पुरूष, शहापूर येथील 60 वर्षीय वृद्धा, लालनगर येथील 59 वर्षीय महिला, बांगर मळा येथील 62 वर्षीय वृद्ध, धनगर मळा येथील 60 वर्षीय वृद्ध, तसेच साजणी येथील 55 वर्षीय महिला आणि शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील 46 वर्षीय पुरूषाचा कोल्हापुरातील आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
कृष्णानगर येथील 57 वर्षीय महिलेचा कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. आजरा येथील 68 वर्षीय महिलेचाही आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील 73 वर्षीय वृद्धाचा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील 70 वर्षीय वृद्धेचा अतिग्रे येथील केअर सेंटरमध्ये मृत्यू झाला. कोल्हापुरातील राजारामपुरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये हुपरी येथील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सीपीआरमध्ये हॉस्पिटलमध्ये कोरोनाने पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये करवीर तालुक्यातील तामगाव येथील 56 वर्षीय पुरूष, पाचगाव येथील 70 वर्षीय वृद्ध, शहरातील साने गुरूजी वसाहतीतील 72 वर्षीय वृद्ध, रमणमळा येथील 60 वर्षीय वृद्ध आणि भुदरगड तालुक्यातील निळपण येथील 60 वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. दरम्यान, या 21 मृत्युंमुळे जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 282 झाली आहे. जिल्हय़ातील ग्रामीण भागात आजपर्यत कोरोनाने 103 जणांचा, नगरपालिका क्षेत्रात 108 जणांचा, महापालिका क्षेत्रात 61 तर अन्य 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ात रविवारी 2 हजार 188 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 1 हजार 452 जणांचे स्वॅब घेण्यात आले, सद्यस्थितीत जिल्हय़ात 5 हजार 280 जण उपचार घेत आहेत. दिवसभरात आजरा 15, भुदरगड 3, चंदगड 2, गडहिंग्लज 4, हातकणंगले 80, कागल 1, करवीर 42, पन्हाळा 3, राधानगरी 7, शिरोळ 17 तसेच नगरपालिका क्षेत्रात 104 आणि कोल्हापूर शहरात 154 नवे रूग्ण मिळून आले. अन्य जिल्हय़ातील 16 नव्या रूग्णांमुळे 448 पॉझिटिव्ह रूग्ण झाले. आजपर्यत 10 हजार 439 रूग्ण झाले आहेत. त्यातील 216 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 4 हजार 337 झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
आजअखेर 4337 कोरोनामुक्त ः डॉ. केम्पीपाटील
जिल्हय़ात रविवारी सायंकाळपर्यत आरटीपीसीआर, सीबीएनएएटी चाचणीचे 862 अहवाल आले. त्यापैकी 651 निगेटिव्ह तर 124 पॉझिटिव्ह आले. ऍन्टीजेन टेस्टिंगच्या 747 प्राप्त अहवालापैकी 551 निगेटिव्ह तर 196 पॉझिटिव्ह आहेत. खासगी लॅबमधील 128 पॉझिटिव्ह अहवालामुळे 448 नवे रूग्ण झाले. आजअखेर 10 हजार 439 पॉझिटिव्हपैकी 4337 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आजअखेर जिह्यात 5820 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
रात्रीपर्यत 448 पॉझिटिव्ह अहवालापैकी आजरा 15 भुदरगड 3, चंदगड 2, गडहिंग्लज 4, हातकणंगले 80, कागल 1 करवीर 42, पन्हाळा 3, राधानगरी 7, शिरोळ 17, नगरपालिका क्षेत्र 104, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 154 व इतर 16 असा समावेश आहे. आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 215, भुदरगड 256, चंदगड 416 गडहिंग्लज 309, गगनबावडा 30, हातकणंगले 1041, कागल 200, करवीर 1110, पन्हाळा 374, राधानगरी 319, शाहूवाडी 336, शिरोळ 412, नगर पालिका क्षेत्र 2187, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 3067 असे 10 हजार 272 आणि इतर 167 अशी 10 हजार 439 रुग्णसंख्या आहे. पॉझिटिव्ह 10 हजार 439 रूग्णांपैकी 4337 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 282 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल रूग्णसंख्या 5820 इतकी असल्याचे डॉ. केम्पीपाटील यांनी सांगितले.