प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 824 नवे रूग्ण आढळून आले. कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 716 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 16 हजार 6 झाली आहे. कोरोनामुक्तांत वाढ होत असतानाच नवे रूग्ण, कोरोना मृत्यूतही वाढ झाली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 810 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 579, नगरपालिका क्षेत्रात 706, शहरात 994 तर 531 अन्य आहेत. दिवसभरात 1 हजार 716 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 42 हजार 351 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 824 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 71, भुदरगड 27, चंदगड 7, गडहिंग्लज 41, गगनबावडा 9, हातकणंगले 146, कागल 93, करवीर 401, पन्हाळा 115, राधानगरी 58, शाहूवाडी 116, शिरोळ 166, नगरपालिका क्षेत्रात 137, कोल्हापुरात 409 तर अन्य 24 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 61 हजार 167 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून शुक्रवारी 14 हजार 927 अहवाल आले. त्यापैकी 13 हजार 43 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 2 हजार 990 अहवाल आले. त्यातील 2 हजार 730 †िनगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 6 हजार 874 अहवाल आले. त्यातील 6 हजार 209 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 5 हजार 63 रिपोर्ट आले. त्यातील 4 हजार 114 निगेटिव्ह आहेत.
शहरातील कोरोनाने मृत्यू,
परजिल्हÎातील बेळगाव, सांगली जिल्हÎातील दोघांचा तर कोल्हापूर शहरातील 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील कोरोना मृत्यूमध्ये लक्षतीर्थ वसाहत, शाहूपुरी, फुलेवाडी, कसबा बावडा, शाहूनगर राजारामपुरी, महाडीक वसाहत, ताराबाई पार्क, शिवाजीनगर येथील व्यक्तींचा समावेश आहे.
टेस्ट संख्या पॉझिटिव्ह रूग्ण
आरटीपीसीआर टेस्ट 2990 210
ऍटीजेन टेस्ट 6874 665
ट्रुनेट टेस्ट 5063 949
एकूण टेस्ट 14927 1824
……………..
वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 409 1415 1824
आजपर्यतचे बाधीत 44678 1,16,489 1,61,167
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1716 1,42,351
दिवसभरातील मृत्यू 8 25 33
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 984 3816 4810
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 210 2730 2990
अँटीजेन 665 6209 6874
ट्रुनेट 949 4114 5063
…………………
सक्रीय रूग्ण 14,006
रूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत 00.00 टक्के
एकूण चाचण्या : शुक्रवार : 14927 एकूण 11,45,644
मृतांची संख्या : 33 जिल्हा : 31 बाहेरील : 2
दीर्घकालीन व्याधी … …
60 वर्षावरील … ….
पहिल्या 48 तासांत मृत्यू … …
आजअखेर मृत संख्या 4810 जिल्हा : 4279 अन्य : 531