प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हÎात बुधवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19 जणांचा मृत्Îू झाला. दिवसभरात 1 हजार 696 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 632 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 810 झाली आहे. कोरोना मृत्यूंत घट झाली असली तरी नव्या रूग्णांत, सक्रीय रूग्णांत वाढ झाली आहे. दरम्यान, गगनबावडा तालुक्यात नवी रूग्णसंख्या निरंक राहिली.
जिल्हÎात बुधवारी कोरोनाने 19 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 130 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 765, नगरपालिका क्षेत्रात 727, शहरात 1 हजार 88 तर अन्य 550 आहेत. दिवसभरात 1 हजार 632 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 62 हजार 976 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 696 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 99, भुदरगड 71, चंदगड 20, गडहिंग्लज 75, गगनबावडा 0, हातकणंगले 197, कागल 152, करवीर 300, पन्हाळा 141, राधानगरी 56, शाहूवाडी 48, शिरोळ 146, नगरपालिका क्षेत्रात 125, कोल्हापुरात 241 तर अन्य 25 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 80 हजार 916 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून बुधवारी 19 हजार 136 अहवाल आले. त्यापैकी 17 हजार 425 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 944 अहवाल आले. त्यातील 3 हजार 840 †िनगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 3 हजार 422 अहवाल आले. त्यातील 3 112 हजार निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 11 हजार 770 रिपोर्ट आले. त्यातील 10 हजार 473 निगेटिव्ह आहेत.
शहरातील 7 जणांचा कोरोनाने मृत्यू
परजिल्हÎातील बेळगाव जिल्हÎातील एकाचा तर कोल्हापूर शहरातील 7 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील कोरोना मृत्यूंमध्ये साने गुरूजी वसाहत, ताराबाई पार्क, कसबा बावडा, पायमल वसाहत, शहरातील प्रत्येकी 1 आणि कदमवाडी येथील दोघांचा समावेश आहे.
वर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 241 1455 1696
आजपर्यतचे बाधीत 48954 1,31,9627 1,80,916
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1632 1,62,976
दिवसभरातील मृत्यू 7 12 19
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 1088 4042 5130
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 89 3840 3944
अँटीजेन 310 3112 3422
ट्रुनेट 1297 10473 11770
…………………
सक्रीय रूग्ण 12,810
रूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत 90.08 टक्के
एकूण चाचण्या ः बुधवार ः 19136 एकूण 13,40,926
मृतांची संख्या ः 19 जिल्हा ः 18 बाहेरील ः 1
दीर्घकालीन व्याधी 6 0
60 वर्षावरील 11 1
पहिल्या 48 तासांत मृत्यू 2 0
आजअखेर मृत संख्या 5130 जिल्हा ः 4580 अन्य ः 550