12 मृत्यू, 234 नवे रूग्ण, 481 कोरोनामुक्त, भुदरगड, गगनबावड्यात नवे रूग्ण नोंद शुन्य
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 234 नवे रूग्ण आढळले तर 481 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 2 हजार 525 आहे. कोरोना मृत्यू, नव्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरात दिवसभरात कोरोनाने एकाचा मृत्यू झाला, पण परजिल्ह्यातील एकाही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही. गगनबावडा अन् भुदरगड तालुक्यात नवी रूग्ण नोंद शून्य राहिली आहे.
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 644 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3 हजार 22, नगरपालिका क्षेत्रात 811, शहरात 1 हजार 221 तर अन्य 590 आहेत. दिवसभरात 481 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 93 हजार 539 झाली आहे. गेल्या 24 तासांत 234 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 3, भुदरगड 0, चंदगड 1, गडहिंग्लज 4, गगनबावडा 0, हातकणंगले 19, कागल 8, करवीर 45, पन्हाळा 18, राधानगरी 1, शाहूवाडी 13, शिरोळ 15, नगरपालिका क्षेत्रात 40, कोल्हापुरात 60, तर अन्य 7 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 1 हजार 708 झाली आहे.
शहरात बुधवारी 60 नवे रूग्ण दिसून आले पण साळोखे पार्क येथील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. परजिल्ह्यातील कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. सद्यस्थितीत शहरात 36 आणि ग्रामीण भागात 726 होम क्वारंटाईन आहेत.
कोरोना रूग्ण : 234 एकूण : 2,01,708
कोरोनामुक्त : 481 एकूण : 1,93,539
कोरोना मृत्यू : 12 एकूण मृत्यू : 5644
सक्रीय रूग्ण : 2525