2 मृत्यू, 104 नवे रूग्ण,141 कोरोनामुक्त, चंदगड, गगनबावडा, शाहूवाडीत रूग्ण नोंद शुन्य
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने ग्रामीण भागातील दोघांचा मृत्यू झाला. दिवसभरात 104 नवे रूग्ण आढळले तर 141 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 1 हजार 389 झाली आहे. नवे रूग्ण, सक्रीय रूग्णांत घट झाली आहे. गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी तालुक्यांत रूग्ण नोंद शुन्य आहे.
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने आर.के.नगर आणि कागल तालुक्यातील सावर्डे खालसा येथील एकाचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5702 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3050, नगरपालिका क्षेत्रात 819, शहरात 1240 तर अन्य 593 आहेत. दिवसभरात 141 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 97 हजार 118 झाली आहे. गेल्या 24 तासांत 104 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 5, भुदरगड 1, चंदगड 0, गडहिंग्लज 7, गगनबावडा 0, हातकणंगले 12, कागल 4, करवीर 12, पन्हाळा 5, राधानगरी 1, शाहूवाडी 0, शिरोळ 13, नगरपालिका क्षेत्रात 13, कोल्हापुरात 27 तर परजिल्ह्Îातील 7 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 4 हजार 209 झाली आहे. सद्यस्थितीत शहरात 18 आणि ग्रामीण भागात 335 जण होम कोरोंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
कोरोना रूग्ण : 104 एकूण : 2,04,209
कोरोनामुक्त : 141 एकूण : 1,97,118
कोरोना मृत्यू : 2 एकूण मृत्यू : 5702
सक्रीय रूग्ण : 1389