प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे 17 रुग्ण मिळाले, मृत्यूसंख्या शुन्य राहिली. दिवसभरात आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सक्रीय रुग्णसंख्या 109 इतकी आहे.
आरोग्य विभागाकडुन प्राप्त झालेल्या अहवालानुसार मंगळवारी करवीर तालुक्यात 3, जयसिंगपूर नगरपालिका 5 आणि हुपरी नगरपालिका क्षेत्रात 3 रुग्ण मिळून आले. कोल्हापूर शहरात 6 रुग्ण आढळले. आरटीपीसीआर टेस्टच्या 237 अहवालांमधून 2, अँटीजेन टेस्टच्या 141 अहवालांमधून 6 तर खासगी हॉस्पिटल आणि लॅबमधून प्राप्त झालेल्या 214 अहवालांमधून 9 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले.