कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. आज रात्री उशिरा २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २७० वर गेली आहे. एका दिवसात पावणे तीनशेच्या घरात रुग्ण सापडण्याची जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.
आज जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा बळी घेतला. इचरकंजी येथे 72 वर्षीय महिला, शहापूर येथील 75 वर्षीय महिला आणि करवीर तालुक्यातील शिये येथील 51 वर्षे पुरुषाचा मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्री बारापर्यंत आकडेवारी
तपासणी 1713
घेतलेले नमुने 1256
उपचारार्थ दाखल 1456
आलेले रिपोर्ट 1658
रिपोर्ट पॉझिटिव्ह 277
रिपोर्ट निगेटिव्ह 1217
मृत्यू 3 एकूण 43
कोरोना मुक्त 37
एकूण पॉझिटिव 1860
एकूण कोराेना मुक्त 971
रात्री उशिरा आणखी पंचवीस पॉझिटिव्ह रुग्णांची भर.