लसीकरण घेणार्यांच्या संख्येत वाढ, 778 जणांना कोविशिल्ड लसीकरण
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी नोंदणीकृत 778 लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेतली. मंगळवारी उद्दिष्टाच्या 50 टक्के लसीकरण झाले होते. बुधवारी त्यात आणखी वाढ झाली. बुधवारी 1100 पैकी 778 जणांनी लस टोचून घेतली आहे. शुक्रवार, शनिवारी लसीकरण होणार असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी दिली.
कोव्हीन ऍपमध्ये बदल केल्याने मंगळवारी कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱयांच्या संख्येत वाढ झाली. जिल्ह्यातील 11 केंद्रावर मंगळवारी लस घेणाऱयांची टक्केवारी 50 इतकी होती. बुधवारी नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या प्रतिसादात वाढ झाली. त्यामुळे 1100 पैकी 778 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. आता शुक्रवारी आणि शनिवारी लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. दरम्यान, लसीकरणाचा गेल्या 3 दिवसांत फक्त चौघांनाच किरकोळ त्रास झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.